जळगाव: जळगाव तालुक्यातील वाघूर धरण १०० टक्के भरले, सर्व दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू
जळगाव जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे वाघूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. मंगळवारी १६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता धरणाचे सर्वच्या सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे वाघूर नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाघूर धरण १०० टक्के भरल्याने जळगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा अनेक वर्षांचा प्रश्न मिटला आहे.