आज दि 3 डिसेंबर सकाळी 9 वाजता मधील पैठण - छत्रपती मार्गावरील इसारवाडी शिवारात ट्रॅक्टर व अॅपेरिक्षात झालेल्या जोराच्या धडकेत अॅपेरिक्षामधील एक महिला मजूर ठार झाली, तर आठ जण गंभीर जखमी झाले आहे. यात मेहमुदा लाला शेख (वय ६६, रा. पिंपळवाडी पिराची, ता. पैठण) असे घटनेतील मयत महिलेचे नाव आहे.पिंपळवाडी पिराची येथून मंगळवारी सकाळी धनगावकडे एका अॅपेरिक्षात आठ महिला मजूर कामाला निघाल्या होत्या. इसारवाडी शिवारात सकाळी ९ वाजेदरम्यान दुभाजकामधून रस्ता ओलांडणाऱ्या एका ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून