उमरेड: उमरेड येथे नगरपरिषद निवडणूक अनुषंगाने ड्रोन पेट्रोलिंग सुरू
Umred, Nagpur | Nov 29, 2025 आगामी नगरपरिषद निवडणूक अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही तसेच निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याकरिता पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात उमरेड परिसरात ड्रोन द्वारे दिवसा आणि रात्री पेट्रोलिंग सुरू केली आहे. निवडणूक कालावधीत अवैद्य दारू आणि अवैध पैसे वाटपावर ड्रोन पेट्रोलिंग द्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे