वडवणी: मयत डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांची ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी कवडगाव येथे जाऊन भेट घेतली
Wadwani, Beed | Nov 2, 2025 डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली असून या प्रकरणाला न्याय मिळावा, अशी सर्वत्र मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) चे नेते अंबादास दानवे यांनी वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे जाऊन संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीदरम्यान अंबादास दानवे यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला आणि न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.