तिवटग्याळ येथे शेतात लागवड केलेल्या संपूर्ण सोयाबीनची बनीम जळून गेल्याने शेतकरी मनोहर पाटील यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच आमदार बनसोडे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन परिस्थितीची स्वतः पाहणी केली. व नुकसानीचा आढावा घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच शासन स्तरावरून व वैयक्तिक पातळीवर मदत मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी आमदार बनसोडे यांनी दिले.