ममनापुर शिवारात आजही पक्क्या रस्त्यांचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शेतीमाल बाजारात नेताना शेतकऱ्यांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत असून, खराब वाटेमुळे ट्रॅक्टर पलटी होण्याच्या घटना घडल्या आहेत. इतकेच नव्हे तर रस्ता नसल्याने माती खाली बसून जेसीबीदेखील अडकून पडल्याची घटना समोर आली आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून जीवितासही धोका निर्माण झाला आहे.