तिरोडा: सरन्यायाधीश गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा माजी आमदार तथा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड यांनी केला निषेध
Tirora, Gondia | Oct 8, 2025 सुप्रीम कोर्टाचे मुख्य सरन्यायाधिश भूषण गवई यांच्यावर एका वकीलाने आपल्या पायातील बुट भिरकावून हल्ला करून न्यायालयात आक्षेप घेऊन अपमान केला. या घटनेचा माजी आमदार तथा काँग्रेस कमिटीचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष दिलीप बन्सोड यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध केला.