सातारा: I
लोणंद नगरपंचायतच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
Satara, Satara | Sep 30, 2025 मंगळवार दि. ३० सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यशवंत निवृत्ती दणाणे आणि सागर रामचंद्र खरात यांनी आंदोलन करुन आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, लोणंद नगरपंचायत यांच्याकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित बस्ती सुधार योजनेत अपहार झालेला आहे. अॅट्रोसिटी कायद्यातंर्गत चुकीच्या पद्धतीने ठरावास मंजूरी देवून निधीमध्ये अपरातफर करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावेत.