सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा येथे पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी आणि घाट रस्त्यावरील संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने वाहतूक नियमात अंशत: बदल केले आहेत. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिलेल्या आदेशानुसार, बुधवार (31 डिसेंबर 2025) ते गुरुवार (1 जानेवारी 2026) या कालावधीत चिखलदरा मार्गावर 'वन-वे' (एकमार्गी) वाहतूक लागू करण्यात आली आहे.चिखलदऱ्याकडे येणारा परतवाडा ते चिखलदरा हा रस्ता..