अकोला: वसंत देसाई स्टेडियमवर जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते मशाल प्रज्वलनाने पदयात्रेचा शुभारंभ
Akola, Akola | Nov 11, 2025 अकोला, दि. ११ : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 11 नोव्हेंबर रोजी जिल्हा प्रशासन, केंद्रीय क्रीडा मंत्रालय, मेरा युवा भारत केंद्र यांच्या वतीने जिल्हास्तरीय एकता पदयात्रा काढण्यात आली. वसंत देसाई स्टेडियमवर जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून पदयात्रेचा शुभारंभ झाला. यामध्ये विद्यार्थी, महिला, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. देशभक्तीपर जयघोषात अग्रसेन चौक, कोतवालीमार्गे पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी संपन्न झाली.