जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील पाण्याच्या टाकीजवळ फटाके फोडण्याच्या कारणावरून दांपत्याला चौघांनी शिवीगाळ करून जबर मारहाण केली. तसेच धारदार चॉपरने चेहऱ्यावर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात बुधवारी 22 सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.