माण: म्हसवडनजीक असाळवाडा घुटुकडे वस्तीवर पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या; खुनाचे आणि आत्महत्येचे कारण अस्पष्ट
Man, Satara | Oct 8, 2025 माण तालुक्यातील हिंगणी - राजेवाडी रस्त्यावर आसाळवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाठीमागे घुटुकडे वस्तीवरील बंडू अंकुश घुटुकडे याने पत्नी अनिता घुटुकडे हिला जीवे मारले आणि त्यानंतर स्वतःगळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावरून बुधवारी दुपारी दीड वाजता मिळालेल्या माहितीनुसार पती आणि पत्नीच्या भांडणातून ही घटना घडली आहे.