नागपूर ग्रामीण: न्यू संजय इलेक्ट्रिक फेब्रिकेशन नावाच्या दुकानातून लाखो रुपयांचे वायर बंडल चोरी
पोलीस ठाणे पारडी हद्दीतील पोवार कॉलनी येथे लोकेश शरणागत यांचे न्यू संजय इलेक्ट्रिक फेब्रिकेशन नावाचे दुकान आहे. या दुकानातून अज्ञात आरोपीने दुकानाचे शटर वाकवून एक कुलर आणि वायर बंडल असा एकूण तीन लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला याप्रकरणी वाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.