विश्वास संपादन करून एका व्यक्तीच्या मालकीची मोटार आणि महत्त्वाची कागदपत्रे घेऊन मोटार दोन लाख रुपयांना गहाण ठेवून आर्थिक फसवणूक केली. मोटार परत मागितली असता शिवीगाळ करत दमदाटी केली. ही घटना बावधनमध्ये घडली. याप्रकरणी २८ वर्षीय तरुणाने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.