नाशिक: फुलेनगर भागात दोन गटात चाललेल्या वादात बंदुकीच्या बंदुकीने गोळीबार करणारा आरोपी अटक
Nashik, Nashik | Nov 3, 2025 बंदुकीने गोळीबार करणाऱ्या आरोपीला आडगाव नाका येथे पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले.पंचवटी भागातील फुलेनगर येथे दोन गटात दगडफेक व गोळीबाराची घटना घडली होती. आरोपी ऋषिकेश उर्फ बाबा गणेश परसे राहणार कुमावत नगर,पंचवटी हा पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता.पंचवटी गुन्हे शोध पथकाचे पोलीस शिपाई अंकुश काळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर आरोपी हा आडगाव नाका येथे आढळून आला आहे.