खटाव: राज्याचा कला, परंपरेचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी शासन कटीबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
Khatav, Satara | Oct 11, 2025 ऐतिहासिक वास्तूंचे जतन संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. राज्यातील कला परंपरेचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी शासन कटीबद्ध असून औंध येथील वस्तू संग्रहालयाचे जतन व संवर्धनासाठी शासनाने ५२ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे. पर्यावरणाचा समतोल राखून, ऐतिहासिक वारसा जपत संग्रहालयाचे नूतनीकरण करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली. शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ८५ व्या औंध संगीत महोत्सवात शनिवारी सायंकाळी सहा वाजता ते बोलत होते.