हदगाव: सुशिक्षित माणस राजकारणात असनं काळाची गरज; वानखेडेंचे शिक्षण माहीत,नशीब चांगले त्यांना सुशिक्षित सुन मिळाली:आ.हेमंत पाटिल
Hadgaon, Nanded | Nov 27, 2025 आज गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान हदगाव शहरातील राष्ट्रीय क्लब मैदान येथे विधानपरिषदेचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील यांनी माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या सुनेच्या उच्च शिक्षणाचे कौतुक करीत म्हटले की, सुशिक्षित माणसं राजकारणात असनं काळाची गरज आहे. माजी खासदार सुभाष वानखेडे हे किती शिकलेले आहेत हे आपल्याला माहीत आहे परंतु त्यांचे नशीब चांगले त्यांना सुन उच्च शिक्षित साॅफ्टवेअर इंजिनिअर मिळाली असल्याचे म्हणत उपरोक्त विधान आज केले आहे.