आष्टी: आमदार सुरेश धस यांच्या उपस्थितीत धानोरा येथे संत बाळूदेव महाराज सप्ताहाची सांगता करण्यात आली
Ashti, Beed | Oct 23, 2025 आष्टी तालुक्यातील धानोरा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिभावाने श्री संत बाळुदेव महाराजांच्या सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, परिसरातील भाविकांनी या धार्मिक सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या पवित्र सप्ताहाच्या सांगता सोहळ्यास आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी उपस्थित राहून भक्तीमय वातावरणात सहभागी होत हरी कीर्तनाचे श्रवण केले. संत बाळुदेव महाराजांच्या पवित्र चरणी नतमस्तक होत आमदार धस यांनी आशीर्वाद घेतला आणि उपस्थित ग्रामस्थ, भक्तगण यांच्याशी मनमोकळा संवाद