बदनापूर: शहरात श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्राचे आ. नारायण कुचे यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण
आज दिनांक 8 नोव्हेंबर 2025 वार शनिवार रोजी रात्री 8 वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते बदनापूर ते छत्रपती संभाजी नगर या मुख्य महामार्गावर असलेल्या श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्राचे लोकार्पण करण्यात आले आहे ,कारण आमदार नारायण कुचे यांच्याच प्रयत्नातून या ठिकाणी नवीन इमारत तयार झाली असून या इमारतीचे लोकार्पण आज आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते पार पडले आहे, यावेळी महिला व पुरुष भक्त उपस्थित झाले होते.