खालापूर: महिला सुरक्षेसाठी खालापूर पोलिसांचा महत्त्वपूर्ण उपक्रम, रेडिसन हॉटेल स्टाफसाठी जनजागृती कार्यशाळा
खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेडिसन हॉटेल येथे उपस्थित महिला कर्मचाऱ्यांसाठी आज बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास एक अत्यंत महत्त्वाची जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सायबर गुन्हे: ऑनलाइन फसवणूक आणि सायबर धोक्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी घ्यावयाची काळजी. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणूक यासंबंधीचे कायदे आणि तक्रार निवारण प्रक्रिया. सेल्फ डिफेन्स आत्मसंरक्षणाचे मूलभूत तंत्र. डायल ११२ आपत्कालीन परिस्थितीत तातडीच्या मदतीसाठी संपर्क साधण्याचे महत्त्व. खालापूर पोलिसांनी हॉटेल स्टाफला आवश्यक माहिती देऊन त्यांची सुरक्षितता आणि कायदेशीर ज्ञान वाढवण्यासाठी केलेले हे कार्य कौतुकास्पद आहे.