अलिबाग: जून्या कर्ज थकीतदारांना मुदत वाढ दिली पाहिजे. मुदत वाढ देऊन नवीन कर्ज देण्याचे धोरण आखले पाहिजे
नेते जयंत पाटील
Alibag, Raigad | Nov 12, 2025 जून्या कर्ज थकीतदारांना मुदत वाढ देऊन नवीन कर्ज देण्याचे धोरण आखले पाहिजे. नवीन कर्ज शेतकऱ्यांना भेटले नाही, तर शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण होईल. 31 मार्चपर्यंत तरतूद झाल्यानंतर एप्रिल महिन्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेला माफीचे पैसे देणे गरजेचे आहे. काही मध्यवर्ती बँक थकीत कर्ज वसूली शिवाय नवीन कर्ज देऊ शकत नाही. पीक कर्जाचे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत एक वेगळे धोरण घेणे गरजेचे आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा बँकेला माफीचे पैसे आवश्यक आहे असे जयंत पाटील म्हणाले.