जालना: जबरी चोरी प्रकरणातील फरार आरोपीला कदीम जालना पोलिसांनी जेरबंद; चोरीची रक्कम जप्त
Jalna, Jalna | Jun 10, 2026 जबरी चोरी करून फरार झालेल्या आरोपीला कदीम जालना पोलिसांनी शिताफीने अटक करत गुन्ह्यातील रोख रक्कम जप्त केली आहे. बुधवार दि. 10 जून 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 जून 2026 रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास नूतन वसाहत परिसरातील गजानन किराणा दुकानाजवळ ही घटना घडली होती. आरोपी ऋषीकेश दीपक कांबळे याने तक्रारदार सुभाष काळुके (रा. नूतन वसाहत, जालना) यांना अडवून शिवीगाळ केली.