वर्धा: स्मार्ट मीटरच्या विरोधात ठराव करणारी मांडवा ग्रामपंचायत ठरली महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत
Wardha, Wardha | Sep 20, 2025 वर्धा जिल्ह्यातील मांडवा ग्रामपंचायतीने स्मार्ट मीटर बसवण्याच्या शासनाच्या निर्णयाला ठाम विरोध दर्शवत एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री समृद्ध गाव योजनेच्या अंतर्गत बोलावण्यात आलेल्या ग्रामसभेत गावकऱ्यांनी एकमुखाने ठराव करून मांडवा गावात स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध केला. यामुळे मांडवा ही स्मार्ट मीटरच्या विरोधात ठराव करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.