निफाड: *शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यवहारीक ज्ञानाचे आकलनही तितकेच महत्त्वाचे – सभापती बाळासाहेब क्षिरसागर*
Niphad, Nashik | Oct 15, 2025 *शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यवहारीक ज्ञानाचे आकलनही तितकेच महत्त्वाचे – सभापती बाळासाहेब क्षिरसागर* विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यवहारीक ज्ञानाचे आकलन होणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा कायम प्रयत्न राहिला आहे, असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सभापती बाळासाहेब (अप्पा) क्षिरसागर यांनी आनंद मेळावा उद्घाटनप्रसंगी केले.