अंबाजोगाई तालुक्यातील दगडवाडी–डोंगर पिंपळा परिसरात बिबट्या आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवार, दिनांक २० डिसेंबर रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या परिसरातील तळ्याजवळ दिसून आला.अंबाजोगाई येथून दूध घालून आखाड्याकडे जात असताना एका शेतगड्याला तळ्यावर पाणी पीत असलेला बिबट्या दिसून आला. ही माहिती परिसरात पसरताच नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान, नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटे बाहेर न पडण्याचे तसेच लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचे आवाह