आज दिनांक 5 डिसेंबर सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजीनगर शहरातील टीव्ही सेंटर परिसरातील जयस्वाल हॉलजवळ आज सकाळी ९ वाजता हिट अँड रनची घटना घडली. नवशिक्या ड्रायव्हर चालवत असलेल्या इरटिगा कारचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार मोटरसायकलना जोरदार धडक बसली. या अपघातात एका तरुणाला गंभीर दुखापत झाली असून, त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धडक झाल्यानंतर कार चालक वाहनासह फरार झाला असून, घटनेचा अधिक तपास सिडको पोलिसांकडून सुरू आहे.