अकोला : मनपा प्रशासनाने पूर्व झोनमधील संताजी नगर, सुधीर कॉलनी येथील खुल्या जागेवर येथील नागरिकांने केलेल्या टीनशेड अतिक्रमणावर आज, दि. 25 नोव्हेंबर 2025 रोजी निष्कासनाची कारवाई केली. मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या आदेशान्वये ही कारवाई सायं. 6 वाजेपर्यंत पोलीस बंदोबस्तात सुरू होती. साहाय्यक आयुक्त राजेश सरप यांच्या मार्गदर्शनात नगररचना विभाग, अतिक्रमण विभाग, पोलीस कर्मचारी व अधिकारी उपस्थित राहून अतिक्रमण हटविण्यात आले.