सिंदखेडराजा तालुक्यातील शेंदुर्जन येथे ७ नोव्हेंबर रोजी एक्का बादशहा जुगार चालत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे यांना मिळताच त्यांच्या पथकाने छापा टाकला असता २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सात आरोपींना अटक केली तर एक फरार झाला आहे.याप्रकरणी गणेश भगवान फड पोलिस कर्मचारी यांच्या फिर्यादीवरून रमेश शिवाजी शिंगणे, सदाशिव सखाराम नागरे आदी विरुद्ध साखरखेर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला.