राजूरा: आदर्श स्मार्ट ग्राम कळमना तर्फे राज्यभरातील आदर्श गावांचा अभ्यास दौरा पूर्ण :गावातील ६८ नागरिकांनचा सहभाग
गावाचा विकास हीच खरी सेवा या ध्यासाने काम करणाऱ्या आदर्श स्मार्ट ग्राम कळमना येथील सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या नेतृत्वाखाली गावातील ६८ नागरिकांनी महाराष्ट्र राज्यातील विविध आदर्श स्मार्ट ग्रामपंचायतींचा अभ्यास दौरा आज दि १३ ऑक्टोबर ला १ वाजता पूर्ण केला. या दौऱ्याचा उद्देश शाश्वत विकासाचे आदर्श मॉडेल जाणून घेऊन कळमना ग्रामविकासासाठी नवीन दिशा मिळवणे हा होता.