वर्धा: अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कामकाज नियमितपणे सुरु : महामंडळाचे कामकाज बंद झाले असल्याची निराधार अफवा
Wardha, Wardha | Nov 10, 2025 अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत महामंडळाचे कामकाज बंद झाले आहे, व्याज परतावा थांबविण्यात आला आहे अशा प्रकारच्या निराधार अफवा सोशल मीडियासह विविध माध्यमातून पसरवल्या जात आहेत. या अफवांना कोणतेही तथ्य नसून, महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याचे काम वगळता इतर सर्व कामकाज सुरळीतपणे सुरु आहे.