भुसावळ येथे टोकरे कोळी आदिवासी जमातीला सातत्याने जातीच्या दाखल्यांसाठी डावलले जात असल्याच्या निषेधार्थ समाजाने मंगळवारी 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता प्रांत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणाला शिवसेना (शिंदे गट) यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.