अकोला: हैदराबाद गॅझेटच्या आधारे ओबीसी आरक्षण देण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात अकोल्यातील ओबीसी समाज बांधवांचे उपोषण
Akola, Akola | Sep 15, 2025 राज्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारे ओबीसी आरक्षण देण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात अकोल्यातील ओबीसी समाज बांधवांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाच जणांनी एकत्र बसून हैदराबाद गॅझेट तात्काळ रद्द करण्याची ठाम मागणी केली आहे. उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे की, हैदराबाद गॅझेट कायम राहिल्यास ओबीसींच्या आरक्षणावर गदा येईल. त्यामुळे सरकारने त्वरित यावर निर्णय घेऊन गॅझेट रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनामुळे जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले