अकोला: २ डिसेंबरला अकोल्याच्या आकाशात ‘फिरती चांदणी’! विश्वभारती केंद्राचे प्रभाकर दोड यांची माहिती
Akola, Akola | Dec 1, 2025 २ डिसेंबरला इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) अकोल्याच्या आकाशातून झळकताना दिसणार आहे. ताशी २८ हजार किमी वेगाने पृथ्वीभोवती फिरणारे हे स्टेशन संध्याकाळी ७.०९ ते ७.११ वायव्य दिशेतून चंद्राकडे जाताना क्षणात अदृश्य होईल. विश्वभारती केंद्राचे प्रभाकर दोड यांनी हे दुर्मिळ दर्शन नुसत्या डोळ्यांनीच पाहता येणार असल्याचे सांगत नागरिकांना वेळ चुकवू नये, असे आवाहन दिनांक 1 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता प्रसिद्धीपत्रका द्वारे केले असून या अद्भुत घटनेचे निरीक्षण ३ ते ५ डिसेंबर दरम्यान विश्वभारती केंद्रा