अंबरनाथ: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, अंबरनाथ बदलापूर लोकल ला वीस मिनिट उशीर झाल्याने प्रवाशांचें हाल
मध्यरात्रीपासून ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ बदलापूर परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. आणि याचा फटका मध्य रेल्वेला बसला.मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. ट्रॅक वर पाणी साचल्यामुळे बदलापूर अंबरनाथ येथील लोकल ला पंधरा ते वीस मिनिट उशीर झाला होता त्यामुळे याचा फटका चाकरमान्यांना बसला. आठवड्यातला पहिल्याच दिवशी कामावर जाण्यासाठी उशीर झाल्यामुळे प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागला.