वाढत्या सायबर गुन्ह्याबाबत अहिल्यानगर पोलीस दलातर्फे जनजागृती करण्यात आली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणे, बीडीडीएस विभागाच्या वतीने शहरातील कोहिनूर मॉल येथे ही जनजागृती करण्यात आली. एटीएम कार्ड, खोटे फोन कॉल्स, एटीएम चा वापर करतांना घ्यावयाची काळजी, सोशल नेटवर्किंग साईटवर होणारी फसवणूक याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.