मोहाडी: सालेबर्डी शिवारात शेतकऱ्याच्या शेतातून १२ हजारांचा मोनोब्लॉक मोटार पंप लंपास; आंधळगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
मोहाडी तालुक्यातील मौजा सालेबर्डी शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतात लावलेला १२,०००/- रुपये किमतीचा मोनोब्लॉक सबमरसीबल मोटार पंप अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आंधळगाव पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी रामचंद्र ठवकर (वय ४५ वर्ष, रा. सालेबर्डी) यांच्या सालेबर्डी शिवारातील शेतात ही चोरीची घटना दिनांक १८ ऑगस्ट रोजी सकाळी ०६:०० वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली आहे. कोणीतरी अज्ञात इसमाने संधी साधून त्यांच्या शेतात लावलेला