पाचोरा: रहमान देशमुख उर्फ टिपू यांची भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या उप-जिल्हाध्यक्षपदी निवड,
भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) निष्ठावान आणि सक्रीय कार्यकर्ते तसेच भाजपा नेते अमोल भाऊ शिंदे यांचे विश्वासू सहकारी रहमान देशमुख (टिपू) यांची भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चाच्या उप-जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून देशमुख हे भाजपाच्या माध्यमातून सक्रियपणे समाजकारण आणि राजकारणात कार्यरत आहेत. पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.