जालना: भगवान परशुराम जयंतीनिमित्त ब्राह्मण समाजाच्या मागण्यांना यश; आर्थिक विकास महामंडळ स्थापन — आनंदाचा
Jalna, Jalna | Apr 19, 2026 ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त जालन्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीला अखेर यश मिळाल्याने समाजात समाधानाची भावना व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ब्राह्मण समाजाने गेल्या अनेक वर्षांपासून शांततामय मार्गाने आंदोलन, मोर्चे आणि निवेदनांच्या माध्यमातून आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवल्या होत्या. अखेर या सातत्यपूर्ण लढ्याला यश म