भंडारा शहरातील स्प्रिंग डेल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा आणि व्यसनमुक्ती या विषयावर विशेष प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलताना अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, ऑनलाइन फसवणूक टाळण्याचे उपाय आणि अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहण्याचे कळकळीचे आवाहन केले. तंत्रज्ञानाचा वापर प्रगतीसाठी करावा, मात्र त्यातील धोक्यांबाबत सतर्क राहावे, असे मार्गदर्शन त्यांनी दिनांक 23 डिसेंबर रोजी...