जालना: जालना जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट; पुढील दोन दिवस वादळी वार्यासह मुसळधार पावसाचा इशारा
Jalna, Jalna | May 31, 2026 प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा (मुंबई) यांनी जालना जिल्ह्यासाठी पुढील काही दिवसांसाठी हवामानाचा गंभीर इशारा दिला असून जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रविवार दि. 31 मे 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार 31 मे आणि 1 जून रोजी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, वादळी वारे, मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.