ठाणे: निवडणुकीच्या काळात बालेकिल्ल्यातच एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का, मातोश्री वर झाला अनेक शिवसैनिकांचा प्रवेश
Thane, Thane | Dec 2, 2025 आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. उपजिल्हाप्रमुखांसह शेकडो शिवसैनिकांनी मातोश्रीवर जाऊन आज ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे. मतदारसंघातील शिवसैनिकांनी पक्ष प्रवेश केल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना नेते राजन विचारे,ठाकरे गट ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे उपस्थित होते.