आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी बेकायदेशीर जमाव जमवून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी डोंगरी येथील कंत्राटी कामगारांविरुद्ध गोबरवाही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपींनी २० जानेवारी रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास मॉईल प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी कंत्राटी कामावर बहिष्कार टाकला आणि रोहणीटोला बावनथडी नदीपात्रातील वॉटर पंप हाऊस बेकायदेशीरपणे बंद पाडले; यामुळे केवळ मॉईल वसाहतच नव्हे, तर बाळापूर आणि कुरमुळा यांसारख्या..