दिनांक 12 डिसेंबर रोजी दुपारी बारा ते चार वाजेच्या दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या शिक्षकांनी जुनी पेन्शनला घेऊन विराट मोर्चा काढला. गोंदिया जिल्ह्यातून या विराट मोर्चात एक हजाराहून अधिक शिक्षक सहभागी झाले होते. एक नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या सर्व शासकीय, निमशासकीय, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा 1982 व 1984 अंतर्गत जुनी पेन्शन योजना लागू करा. अशी मागणी या मोर्चा दरम्यान करण्यात आली.