नागपूर शहर: गिट्टीखदान हद्दीत गुंडांनी माजवली दहशत ; पोलिसांनी शिकवला धडा
2 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीत काही गुंड एका व्यक्तीला मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याची गिट्टीखदान पोलिसांनी तात्काळ दखल घेत त्या आरोपींना ताब्यात घेऊन जाहीररित्या माफी मागायला लावत धडा शिकविला आहे. पोलिसांनी या तरुणांना चांगलीच अद्दल घडविली आहेत.