छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील भवन गावाजवळ ट्रॅफिक झाली जाम, ट्रॅफिक मध्ये अडकली ॲम्बुलन्स
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 29, 2025
आज बुधवार 29 ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील भवन गावाजवळ पूर्णा नदीच्या पुलावरती एक ट्रक नादुरुस्त झाल्याने मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झाली होती, वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या सदरील ट्राफिक मध्ये ॲम्बुलन्स अडकली ची घटना आज रोजी घडली असून नागरिकांच्या मदतीने ॲम्बुलन्स ला मार्ग करून देण्यात आला आहे पोलिसांनी सदरील वाहतूक सुरळीत केली आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.