परभणी: आमडापुर येथील श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्सच्या आठव्या गळीप हंगामाचा शुभारंभ आमदार डॉ राहुल पाटील यांच्या हस्ते संपन्न
आमडापुर येथील श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्स कारखान्याच्या आठव्या गळीप हंगामाचा शुभारंभ आज रविवार 26 ऑक्टोंबर रोजी दुपारी 1 40 वाजता आमदार डॉ राहुल पाटील व संचालक अॅड. प्रमोद जाधव यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शेतकरी मेळावाही आयोजित करण्यात आला होता. त्यास मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. वेदप्रकाश पाटील, ज्येष्ठ संचालक अॅड. न.चि. जाधव, पुणेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलग व ऊस शास्त्रज्ञ डॉ. कपील सुशीर हे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.