चंद्रपूर जिल्ह्यातील मैथुर येथील एका शेतकऱ्याने सावकाराकडून १ लाख रुपये कर्ज घेतले असताना परताव्याच्या नावाखाली तब्बल ७४ लाख रुपये उकळल्याचा गंभीर आरोप आहे. तसेच आर्थिक अडचणींचा गैरफायदा घेत शेतकऱ्याला परदेशात नेऊन त्याची किडनी काढण्यात आल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. या घटनेचा स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मनीष जाधव यांनी तीव्र निषेध करत प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी दि. १७ डिसें सायं ६ वाजता केली आहे.