अमरावती: अर्जुन नगर भागात विकास योजनेच्या ९२ लक्ष निधीतून विकासकामांचा शुभारंभ; आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते भूमिपूजन
अमरावती महापालिका क्षेत्रातील अर्जुन नगर भागात वाढत्या रहिवासी क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याला घेऊन आमदार - सौ. सुलभाताई खोडके यांनी सातत्यपूर्ण विकास कामांची मालिकाच राबविली आहे. या अंतर्गत प्रभागात विविध ठिकाणी एकंदरीत ९२ लक्ष निधीतून पायाभूत सुविधांच्या विकासकामांचे भूमिपूजन आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते करण्यात आले.