भद्रावती: न्यायालयाच्या आदेशानंतरही फेरफार न केल्याने शेतकऱ्याचा तहसील कार्यालयात विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न.
न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतांना फेरफारासाठी तहसील प्रशासनाकडून होत असलेल्या टाळाटाळीला कंटाळून एका शेतकऱ्याने थेट तहसील कार्यालयात विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना दिनांक २६ रोज शुक्रवारला सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास भद्रावती तहसील कार्यालयात घडली. या घटनेमुळे महसूल विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. परमेश्वर ईश्वर मेश्राम, वय५५ वर्ष, राहणार मोरवा असे या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असुन त्याला उपचारार्थ चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले आहे.