विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरमधील इम्पेरियाल सेलिब्रेशन हॉल येथे सोमवारी सकाळी भाजपवर टीका केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजप जागा जिंकू शकणार नसल्याने त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेतले आहे. परंतु इतके सगळे करूनही भाजप राज्यात १५ ते १८ पेक्षा जास्त जागा जिंकणार नसल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.